भिवंडी तालुक्यात जिजाऊ संघटनेच्या १६ शाखांचे उदघाटन

भिवंडी ।। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेच्या भिवंडी तालुक्यात १६ शाखांचे उदघाटन रविवार दिनांक २४/१०/२०२१ रोजी जिजाऊ संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा तथा महिला सक्षमीकरण ठाणे जिल्हा अध्यक्षा मोनिका ताई पानवे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .यामध्ये  भिवंडी तालुक्यातील केवणी, कोपर, पूर्णा, चरणी पाडा, डुंगे, पायगाव, पालिवली,वरण्याचा पाडा, कोलीवली, बोरपाडा, शेलार, कोन,(धर्मा निवास),कोन (गिरधर नगर)सुरई , आलीमघर ,व मानकोली आदी गावात नवीन शाखा उघडण्यात आल्या. भिवंडी तालुक्यात २२१ गावे असून १२० ग्रामपंचायत आहेत .भिवंडी तालुक्यात आतापर्यंत जिजाऊने  गाव व पाड्यात १५० शाखा सुरू केल्या आहेत. जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप, डोळ्यांचे ऑपरेशन, रक्तदान, विद्यार्थ्यांना मोफत वह्या, शेतकऱ्यांना आंबे व शेवग्याची रोपे, महिलां करीता  गृहोपयोगी वस्तू बनविणे, शिक्षणासाठी आर्थिक मदत, गरीब व गरजूंना आर्थिक मदतीचा हात,मोठ्या आजारावरील ऑपरेशन, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना मदतीचा हात, झडपोली येथील मुख्य कार्यालयामध्ये सि बी एस सी शिक्षण, पोलीस प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा, यम पी एस सी व यूपी एस सी स्पर्धा परीक्षा इत्यादी कार्य सुरू आहे.आपल्या मनोगतात बोलतांना मोनिका ताई पानवे म्हणाल्या की, आपल्या खेड्यापाड्यातील मूल ही शिकली पाहिजेत नुसती शिकून चालणार नाही तर चांगले शिक्षण घेऊन कुणी डॉक्टर ,इंजिनियर वकील, तर झालेच पाहिजेत यापुढे जाऊन सांगेन की,माझ्या खेड्यापाड्यातील मूल-मुली ही शासकीय कार्यालयात तहसीलदार, प्रांत, कलेक्टर व्हावे हे जिजाऊचे स्वप्न आहे.या करिता शिक्षणासाठी जी काही मदत लागेल त्या करिता जिजाऊ संस्था कमी पडणार नाही ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल.या १६ शाखांच्या उदघाटन प्रसंगी कैलास भोईर , साईनाथ भेरे , रोहित होन , जितू पाटील , राहुल पाटील निलेश शेलार , समृद्धी ठाकरे , जिजाऊ शाखा अध्यक्ष ,सदस्य ,नवनिर्वाचित पदाधिकारी व जिजाऊचे सर्व स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास भोईर यांनी केले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट