नारपोली भिवंडी येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

भिवंडी ।। भिवंडी शहरात शिवसेनेने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्यानंतर आता विभाग विभागात शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावे घेण्यास सुरवात केली आहे. उपशहरप्रमुख विरेंद्र पाटील यांच्या नारपोली विभागात शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात पश्चिमचे विधानसभा संघटक मदन भोई यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिवसेनेचे शहर सचिव महेंद्र कुंभारे यांनी महानगरपालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना मनामनात घराघरात कशी पोहचेल, तसेच भिवंडी महानगरपालिकेवर भगवा कसा फडकेल याविषयी शिवसेनेची रणणिती काय राहिल याचे मार्गदर्शन केले. तसेच भगवा फडकल्यानंतर भिवंडी मनपा अवघ्या दोन वर्षात २०२४ पर्यंत ठाणे, मुंबई शी स्पर्धा करताना दिसेल असा अँक्शन प्लान शिवसेनेकडे तयार असल्याचे सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात शहरप्रमुख सुभाष माने यांनी सांगितले की, भगवा खांद्यावर तोच घेऊ शकतो जो मर्द आहे, आणि नारपोली विभागात सर्व मर्द शिवसैनिक आहेत. त्यावेळी टाळ्यांच्या गजरात कार्यकर्त्यांनी या विधानाचे स्वागत केले. तसेच पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी. प्रत्येक शाखाप्रमुखाने जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश शहरप्रमुख सुभाष माने यांनी दिले. अशाप्रकारे अतिशय उत्साहाच्या वातावरणात कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी उपशहरप्रमुख विरेंद्र पाटील आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट