रुक्मिणीबाई रुग्णालयातील अत्याधुनिक उर्जा कार्यक्षम उद्वाहन यंत्रणेचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

कल्याण ।। कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णांसाठी दोन उद्वाहने रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. तथापी सध्याची जुनी उद्वाहने 1997 साली म्हणजे 25 वर्षापूर्वी बसविण्यात आली होती. परंतू सततच्या वापरामुळे सदर उद्वाहनांची  झीज झाल्याने त्यांचे आयुष्यमान  कमी होत आहे, त्यामुळे  रुग्णालयात येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, आरोग्य कर्मचारी इ.ची  गैरसोय होऊ नये याकरीता एक जुने उद्वाहन बदलून  नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्ट्रेचर/पॅसेंजर उद्वाहन, बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात  बसवण्यात आले  असून सदर उद्वाहनाचे उद्घाटन आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उद्वाहन हे गियर लेस, उर्जाकार्यक्षम असल्यामुळे विजेची बचत होणार आहे. सध्यस्थितीत 2 पैकी  एका  उद्वाहनाचे काम पूर्ण झाले असून लवकर दुस-या उद्वाहनाच्या कामास  सुरुवात  करण्यात येईल व ते सर्वांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल.

यासमयी शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, बाई रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैदयकिय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके, महापालिका सचिव संजय जाधव, विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, उप अभियंता जितेंद्र शिंदे,  क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधिर मोकल व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट