रस्त्यावरील खड्डे चुकवित गणपतीच्या मूर्ती भिवंडीत दाखल.रस्ते दुरुस्ती करण्याची गणेश मंडळाची मागणी

भिवंडी। सार्वजनिक गणेश उत्सवास येत्या 31 आँगस्ट पासुन सुरू होणार आहे.त्यामुळे विविध सार्वजनिक उत्सव मंडळानी  जोमाने तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवापूर्वी मुख्य रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यां कडून करण्यात आली होती मात्र आयुक्त महापालिका प्रशासनाक कडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर खड्डे कायम आहेत.त्यामुळे गणेश भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत मुंबई ठाणे येथून मोठ्या गणेश मुर्ती  वाजत गाजत आणण्यास सुरवात केली आहे.खराब रस्ते दुरूस्ती बाबतीत पालिकेने आता पर्यंत लाखो रुपये खर्च केले आहेत त्यामुळे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
       
गणेशोत्सव निमित्त भिवंडी शहरातील सर्व गणेश मंडळांनी आपले परिसरात मंडप टाकले व गणेश मुर्त्या आणण्याची तयारी सुरू केली आहे.मात्र शहरातील रस्ते पावसामुळे मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत.जागोजागी खड्डे पडल्यामुळे गणेश मुर्त्या आणताना फार मोठा त्रास होत आहे. खराब रस्ते मुळे वाहतूक कोंडी चा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी याप्रकरणी लक्ष घालून गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी खराब रस्ते दुरुस्त करण्याचे बाबत बांधकाम विभागाला आदेश द्यावे अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे माजी अध्यक्ष शरद भसाळे,किसन काठवले,विशाल पाठारे,अँड.नाना वगळ यांचाकडून करण्यात आली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आजही शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खराब झाले आहेत असे असताना शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव  धामणकर मित्र मंडळ, गौरीपाडा येथील संयुक्त क्रीडा मंडळ,तसेच गणेशोत्सव मंडळ, काप आळी यांनी कल्याणरोड येथील रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवित आपल्या गणेश मुर्ती वाजत गाजत मंडपामध्ये आणून विराजमान केले आहे.खराब नादुरुस्त झालेल्या रस्त्यांवरून गणेश मुर्ती आणल्या जात असल्यामुळे गणेशोत्सव उत्सव मंडळानी  तीव्र नाराजी व्यक्त केेली.भिवंडी पालिकेने काही  ठिकाणी लाखो रूपये खर्च करून पालिकेने ठेकेदारा माफँत डांबर टाकले पण मुसळधार पावसात सर्व निकुष्ट डांबर पाण्यात वाहुन गेले.तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर लावण्यात आलेले पेव्हर ब्लाँक सुध्दा उखडले गेले आहेत त्यामुळे गणेशभक्त तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.महापालिकेने तातडीने उपाय योजना करून रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी गणेशोत्सव महामंडळांचे माजी अध्यक्ष शरद भसाळे यांनी केली आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट