पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा, विद्यार्थी वर्गाने साकारल्या गणेश मूर्ती

भिवंडी। शासनाच्या नियमाप्रमाणे पालिका आयुक्त अजय  वैद्य यांच्या निर्देशानुसार शहरात पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करणे आवश्यक आहे त्यानुसार पर्यावरण पूरकमूर्ती देखील आवश्यक आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस याच्यामुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन शाडूच्या मूर्ती बनवणे , त्याचा वापर करणे आवश्यक आहे त्यानुसार भादवड येथील शाळा क्रमांक 45 मध्ये विद्यार्थी वर्गांमध्ये पर्यावरण पूरक गणेशाचे जाणीव निर्माण करण्याकरता शाडूच्या मातीपासून  गणेश मूर्ती बनविणे याची कार्यशाळा आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला पालिका पर्यावरण दक्षता मंडळ ठाणे याच्या सौ सुवर्णा बांगे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी वर्गांकडून शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवून घेतल्या यावेळी पालिका प्र. उपायुक्त बाळाराम जाधव, अनिल आव्हाड पर्यावरण विभाग प्रमुख,  संजय केणे,निरीक्षक पर्यावरण विभाग,  गणेश धुमाळ भादवड शाळा  शाळा क्रमांक 45 चे मुख्याध्यापक उपस्थित होते. सर्व विद्यार्थी यांनी या गणेश मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला व ही मूर्ती घरी स्थापन करण्याचा संकल्प केला व पर्यावरण पूरक गणेश साजरा करूया असा निर्धार केला.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट