सरवली ग्रा.पं.अतर्गत ठाकुरपाडा येथे स्मशानभुमीच्या संरक्षण भिंतीचे भुमीपुजन

भिवंडी ।। सरवली ग्रामपंचायत अंतर्गत ठाकुरपाडा,ठाकुरगांव येथील स्मशान भुमीच्या संरक्षक भिंतीच्या विकास कामाचा भुमीपुजन सोहळा ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या हस्ते करण्यात आले.स्मशानभुमीच्या संरक्षण कामासाठी ग्रा.पं.सदस्य राज ठाकरे व भाविका शिवनाथ ठाकरे यांनी अथक प्रयत्न केले.यापुर्वी देखील सरवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन अनेक विकास कामे राबवली गेली त्यामुळे सरवली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विकासाचा झंझावात सुरु आहे. विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी युवा नेते विनोद ठाकरे,गांवचे मा.पं.स.सदस्य गणेश चौधरी,मा. मुकुंद बा. चौधरी.मा.सरपंच तुळशिराम पाटील,कृषी उत्पन्न संचालक भीम चौधरी,मा.सरपंच दिनकर ठाकरे,मा.सरपंच शिवनाथ ठाकरे,सरपंच संध्या नितेश चौधरी,उपसरपंच कु.करण किशोर मार्के ,पोलिस पाटिल सोमनाथ ठाकरे,सुधाकर तुळशीराम ठाकरे,भगवान दत्तु ठाकरे,कैलास ठाकरे,कबिर मारूती ठाकरे,जितेंद्र ठाकरे,शारदा बा.ठाकरे,संदेश कि.ठाकरे,गुरूनाथ ठाकरे,एकनाथ ठाकरे, पवन तरे,ग्रामसेवक मोहसिन शेख,इंजिनीअर राठोड,तुषार चौधरी,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट