क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन
- एबी न्यूज, वार्ताहार
- Apr 11, 2022
- 340 views
कल्याण।। क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या समयी उपस्थित कर विभागाचे उपआयुक्त विनय कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहाय्यक आयुक्त सुधिर मोकल, किशोर ठाकुर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
त्याचप्रमाणे कल्याण (प) येथील महात्मा फुले चौकातील क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळयास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. "क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे कार्य महान आहे", त्यांच्या या पुतळयाचे पावित्र्य राखण्यासाठी नियमित दक्षता घेतली जाईल. त्यानुसार संबंधित अधिका-यांना व पोलिस विभागाला सुचना दिल्या जातील अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना दिली.
डोंबिवली (प) येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळयासही विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या समयी सहा.आयुक्त अक्षय गुडधे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील महात्मा फुले यांच्या पुतळयास पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
रिपोर्टर