टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्र मध्ये शिरल्या पाणी
- एबी न्यूज, वार्ताहार
- Jul 13, 2022
- 318 views
कल्याण ।। दिवसभर होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे, टिटवाळा येथील 7.5 द.ल.ली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्यामुळे दुपारी 2.00 वाजल्यापासून सदर जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे त्यामुळे उद्या टिटवाळा गाव ते अंगण सोसायटी या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. त्याचप्रमाणे 100 द.ल.ली मोहिली जलशुद्धीकरण केंद्र उल्हास नदीचे पाणी झपाट्याने शिरल्यामुळे तेथील पम्पिंग देखील बंद करण्यात आली आहे, त्यामुळे कल्याण मधील पाणीपुरवठा सध्या बंद करण्यात आला असून उद्या कल्याण पश्चिमेतील घोलप नगर, योगीधाम, मुरबाड रोड, रामबाग लेन नंबर 1 ते 6, चिकनघर, सिंधिकेट, फॉरेस्ट कॉलनी, मिलिंद नगर, सह्याद्रीनगर, बिर्ला कॉलेज रोड, भोईरवाडी, खडकपाडा सर्कल पर्यंत, , संतोषी माता रोड, रीजन्सी सोसायटी गायत्री धाम सावरकरनगर ,इंदिरानगर मांडा ,पश्चिम बल्यानी,मोहिली, गाळेगाव आर एस टेकडी ,मोहने, अटाळी वडवली ,शहाड ,अंबिवली गाव ,उंबरणी या परिसरात तसेच कल्याण पूर्व येथील अशोक नगर, शिवाजीनगर वालधुनी या भागात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कल्याण मधील कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली आहे.
जलशुद्धीकरण केंद्रातील पम्पिंगची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कल्याण मधील पाणीपुरवठा सुरळीत होईल तथापि काही काळ पाणीपुरवठा गढूळ स्वरूपात होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात येत आहे.
कल्याण पश्चिम परिसरात याबाबतची माहिती रिक्षांमधून ध्वनिक्षेपकद्वारे नागरिकांना अवगत करण्यात येत आहे.
रिपोर्टर