
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होणार साजरा 9 ते 17 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Aug 11, 2022
- 336 views
भिवंडी।। स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे ऑगस्ट क्रांती दिन. नऊ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिन हा साजरा केला जातो. याच क्रांतिदिनाचे औचित्य साधून आज पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या वतीने शहीदाना आदरांजली वाहिली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने संपूर्ण देशभरात साजरा होत असतानाच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय भिवंडी च्या वतीने दिनांक 09 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, दिनांक 09 ऑगस्ट रोजी शहिदाना समरण करून सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले, त्यानंतर देशभक्तीवरील पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केली होती, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, तर दिनांक 10 ऑगस्ट रोजी स्वछ भारत अभियान म्हणून वऱ्हालदेवी तलाव परिसरामध्ये स्वच्छता कार्यक्रम आयोजित केला आहे तर दिनांक 11 ऑगस्ट रोजी आपल्या जिल्ह्यातील एका आदर्श गावाची माहिती वर्णन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे तर दिनांक 12 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय एकता आणि अखंडता तसेच माझे प्रेरणा दायी स्वातंत्र्य सैनिक या विषयावर निबंध लेखन तर दिनांक 13 ऑगस्ट रोजी वृक्षारोपण चा कार्यक्रम आणि 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहन करून त्यानंतर धामणकर नका ते कामतघर पर्यंत रॅली काढून स्ट्रीट प्ले प्रोग्राम होणार आहे तर 17 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीतांचे गायन आणि डान्स च्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे प्रिन्सिपल महेक पठाण मॅडम यांनी सांगितले।
रिपोर्टर