नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कल्याण पूर्व येथे चिंचपाडा परिसरात हळदी समारंभ आयोजित करणाऱ्यांवर तक्रार दाखल

कल्याण ।। महाराष्ट्रात तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून शासनाच्या आदेशानुसार आता 14 एप्रिल 2021, रात्री 8.00 वाजल्यापासून दिनांक 1 मे 2021 सकाळी 7.00 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना साथीला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी  या निर्बंधांचे पालन करणे अपेक्षित आहेत, असे असताना कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरातील वैभव प्रकाश म्हात्रे व प्रकाश महादू म्हात्रे यांनी लग्नाच्या हळदी समारंभात काल रात्री सोशल डिस्टसिंगचे पालन न करता मास्कचा वापर न करता मनाई आदेशाचा भंग केला,त्यामुळे 9/आय प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे वैभव प्रकाश म्हात्रे व प्रकाश महादू म्हात्रे यांचे विरुद्ध भा.द.वि कलम 188 साथरोग प्रतिबंध कायदा 1897 चे कलम 3(1) आणि राष्ट्रीय आपत्ती कायदा 2005 चे कलम 51(बी) प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.

कोरोना साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी वारंवार हात धुणे सार्वजनिक ठिकाणी वावरताना न चुकता मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे(social distancing)या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट