चिपळून येथे जिजाऊच्या मदत कार्याला सुरुवात.

भिवंडी।। कोकणवासियांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था, महाराष्ट्रची टीम चिपळूनमध्ये दाखल झाली आहे.  त्यांच्या सोबत ५ हजार कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य किट, १० हजार ब्लॅंकेट, ५ हजार बिस्लेरी बॉटल, औषधे, लहान बालकांसाठी बिस्कीटे, दूध पावडर व आदी जीवनावश्यक साहित्य आहे. पुढील काही दिवसांत हे सर्व साहित्य जिजाऊ टीम पुरग्रस्तांना वाटप करणार आहे. कोकणावर जे संकट ओढवले आहे ते दूर करण्यासाठी  जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शक्य तेवढी मदत केली जाईल. कोकणातील प्रत्येक नागरिक हा जिजाऊ परिवाराचा भाग आहे आणि त्यांना मदत करणं हे आमचे कर्तव्य असल्याचं जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष 

निलेश सांबरे यांनी म्हटले आहे. आज दलवटने (बागवाडी), नलावडेवाडी, खादट भोईवाडी, नवीन कोलकेवाडी, पेठमापया गावांमधील नागरिकांना मदत करण्यात आली. तसेच पाठमाप येथे पूरग्रस्तांना मदत करतांना रत्नागिरी-सिधुदुर्गचे खासदार  विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार  वैभव नाईक, सामाजिक कार्यकर्ते  किरण सामंत व आदी पदाधिकारी उपस्थित होते. चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिजाऊ संस्थेचे २५ स्वयंसेवक व ४ रुग्णवाहिका, ५ टेम्पो पुढील काही दिवस मदत कार्यात सक्रिय राहणार आहेत, असे जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले।

रिपोर्टर

संबंधित पोस्ट