शिवसेना आली रिक्षावाल्यांच्या मदतीला धावून ---- शहरप्रमुख प्रसाद पाटील यांचा पुढाकार 

भिवंडी।। मध्यमवर्गीयांची जीवन वाहिनी म्हणजे रिक्षा. घरातून बाहेर पडल्यावर सर्वप्रथम नजरेस पडणारे वाहन म्हणजे रिक्षा. शिवाय अत्यंत गरजेचे साधन म्हणजे रिक्षा. याच रिक्षामुळे सर्वसामान्य जनतेला सुखकारक प्रवास करता येतो. रिक्षा नसेल तर जनतेचे फार हाल होतात. हे आपण बंद च्या दरम्यान पाहतोच. शिवाय याच रिक्षामुळे हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सोय होत आहे. रिक्षा चालली नाही तर आजही कित्येक कुटुंबावर उपाशी झोपण्याची वेळ येते. अशा लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या रिक्षा चालकांवर एक नवीनच संकट उभे राहिले आहे. याची माहिती शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी थेट शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद (भाई) पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही समस्या टाकली.   कर्तव्यदक्ष आणि लोकांच्या मदतीला तात्काळ धाऊन जाणारे शिवसेनेचे भिवंडी शहरप्रमुख प्रसाद (भाई) पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन थेट जयंत पाटील साहेब RTO ठाणे, यांची भेट घेतली. रिक्षा चालकांना रिक्षाचे मीटर तात्काळ तपासण्याचे  (रिकेलीब्रेशन) पत्रक परिवहन विभागाने काढले आहे. त्याची मुदत १६ जानेवारी २०२३ पर्यंत होती. शिवाय ज्यांनी मीटर तपासणी केली नाही त्यांना प्रति दिवस रु.५०/- दंड आकारण्यास सुरवात केली असल्याचे RTO जयंत पाटील साहेब यांच्या निदर्शनास आणुन दिले. रिक्षा चालकांच्या अडचणी लक्षात घेता मीटर तपासणीसाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देऊन दंड आकारणी बंद करावी. मीटर तपासणीसाठी भिवंडीत कँप लावावा अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद (भाई) पाटील यांनी केली. त्यावेळी परिवहन अधिकाऱ्यांना मागणी मान्य करुन रिक्षा चालकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे रिक्षा चालकांनी कौतुक केले. यावेळी शिष्टमंडळात शहरप्रमुख प्रसाद पाटील यांच्यासह रिक्षा युनियनचे अध्यक्ष मेहबूब फुलारे, रईस मोमीन, सय्यद नूर, राकेश मोरे (उपशहरप्रमुख), गोकुळ कदम (सचिव विधानसभा पूर्व), परमेश्वर अंबोरे ( समाजसेवक), स्वप्निल जोशी (विभागप्रमुख), अर्जुन (बाळा) साळुंके (उपविभागप्रमुख)  इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते!

रिपोर्टर

संबंधित पोस्ट