फ प्रभागातील साईनाथ प्रसाद G+4 या अतिधोकादायक इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई

कल्याण ।। महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार, विभागीय उप आयुक्त पल्लवी भागवत यांचे मार्गदर्शनाखाली फ प्रभागातील सहा.आयुक्त भरत पाटील यांनी डोंबिवली पूर्व येथील मानपाडा रोडवरील साईनाथ प्रसाद हि G+4 अतिधोकादायक ईमारत निष्कासनाची धडक कारवाई आज सुरू केली. सदर इमारत 53 वर्षे जूनी असून हि इमारत रहिवासमुक्त करुन इमारतीतील रहिवाश्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. सदर इमारतीस मागील 2 वर्षापासून नोटीस बजावण्यात येत होती. या इमारतीच्या निष्कासनाची कारवाई दि.28/10/2021 पासून मनुष्‍यबळाने सुरु करण्यात आली होती. आज 1 हाय जो क्रशर मशिन  व 1 पोकलन मशिनच्या सहाय्याने निष्कासनाची कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. निष्कासनाची  कारवाई पुढील 2 दिवसात  पुर्ण होईल. या कारवाईच्या वेळी सहा. आयुक्त, ह प्रभागक्षेत्र सुहास गुप्ते, उप अभियंता शैलेश मळेकर, सहा. आयुक्त वाहतूक शाखा,पोलीस निरिक्षक वाहतुक पोलिस , महापालिका पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट