डोंबिवली एम.आय.डी.सी. परिसर कचरा मुक्त करण्याच्या अनुषंगाने बैठक

कल्याण ।। कल्याण डोंबिवली महापालिकेत शिळफाटा मार्गे येताना एम.आय.डी.सी. परिसरात सर्वत्र कचरा पडलेला दिसतो त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार डोंबिवली  एम.आय.डी.सी. परिसर कचरामुक्त करण्याच्या अनुषंगाने आज कामा संघटनेच्या कार्यालयात कामा चे देवेन सोनी,  एम.आय.डी.सी.चे उप अभियंता पतंगे, महापालिका घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे, ई प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवार, महापालिका CSI नरेंद्र धोत्रे, SI अनिकेत धोत्रे यांच्या उपस्थितीत  घनकचरा व्यवस्थानाबाबत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत MIDC क्षेत्रात पडणारा "Domestic waste" , फेज 1व फेज 2 मधील कंपन्यातील  Dry waste व झाडांचा पालापाचोळा यांचे संकलना व विल्हेवाट लावण्यासाठी खाजगी संस्था नेमणे व रस्त्यावर पडणा-या /कचरा टाकणा-या नागरिकांविरूध्द कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याकरीता  संयुक्तिक भरारी पथक नेमणे व  कचरा निर्माण करणारे आठवडे बाजार बंद करणे इत्यादी बाबींवर महत्वपूर्ण चर्चा घडून आली. MIDC भागातील इंडस्ट्री मधील प्लास्टिक, कागद इ. सुका कचरा महानगरपालिकेने  नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत उचलण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली, जेणेकरून महापालिकेवरील ताण कमी होईल. दर 15 दिवसांनी  संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल, असाही  निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट