अशोक भोईर यांना देशातील सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन पुरस्कार
- एबी न्यूज, वार्ताहार
- Nov 16, 2022
- 337 views
कल्याण : अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक तुकाराम भोईर यांना भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचा दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून देण्यात येणारा महत्वाचा असणारा `सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन पुरस्कार' जाहीर झाला आहे.
येत्या ३ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणार्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर पुरस्कार २०२१ या वर्षासाठी आहे. संपूर्ण देशातून मोजक्याच दिव्यांगांना हा पुरस्कार दिला जातो. अशोक भोईर कल्याणमधील उंबर्डे गावचे दिव्यांग रहिवाशी आहेत.
रिपोर्टर