
महाराष्ट्र शासनाच्या "शासन आपल्या दारी टप्पा २" या उपक्रमांतर्गत, महानगरपालिकेच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Feb 23, 2024
- 151 views
भिवंडी।। महाराष्ट्र “शासनाच्या शासन आपल्या दारी टप्पा २" या उपक्रमांतर्गत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या निर्देशानुसार भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने दि.२७ फेब्रुवारी २०२४ ते ०१ मार्च २०२४ रोजी पर्यंत सकाळी १० ते ५.३० वाजेपर्यंत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याकरीता भिवंडी शहरातील तमाम नागरीकांना भिवंडी महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी आवाहन केले आहे की, ज्या मालमत्ताधारकांना/मिळकतधारकांना त्यांचे मालमत्ता हस्तांतरण, नव्याने कर आकारणी, वाढीव कर आकारणी (स्वयं मुल्यांकन) करावयाचे आहे. तसेच ज्या नागरीकांना थकबाकी नसल्याचा दाखला, असेसमेंट उतारा, विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. अशा नगरीकांनी अर्ज व त्यासोबत खालील दर्शविल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रासह हजर राहुन या शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या योजनांचा लाभ घेऊन घ्यावा.
१) विवाह नोंदणी प्रमाणपत्र या करिता -विवाह नोंदणी फ़ॉर्म, आधार कार्ड, शाळेचा दाखला, जन्म दाखला, शिधापत्रिका, सत्यप्रतिज्ञा पत्र, रु.१०० चे कोर्ट फ़ी रटॅम्प, लग्नपत्रिका, साक्षिदार यांचे आधार कार्ड व शिधापत्रिका २) जन्म प्रमाणपत्र या करिता- अर्ज, हॉस्पिटल चे नोंदणी पत्र, आई वडिलांचे आधारकार्ड, ३) मृत्यु प्रमाणपत्र -अर्ज, हॉस्पिटल चे नोंदणी पत्र, स्मशान भूमी पावती, मयत व्यक्तीचे आधारकार्ड, अर्जदाराचे आधारकार्ड, ४) मालमत्ता हस्तांतरण या करिता- अर्ज, विक्री करारनामा, खरेदीखत, मालमत्ता कराची पावती, पाणीपट्टी पावती, आधारकार्ड, ५) नविन परवाना देणे - अर्ज, घरपट्टी, ओळखपत्र (आधारकार्ड), भाडे करारनामा, ६) परवाना हस्तांतरण - अर्ज, घरपट्टी, ओळखपत्र (आधारकार्ड), भाडे करारनामा, ७) जाहिरात परवाना- अर्ज, आधारकार्ड, जाहिरातीचा नमुना प्रत घर मालकाची एन.ओ.सी., ८) थकबाकी नसल्याचा दाखला या करिता- अर्ज, घरपट्टी पावती, ९) नव्याने कर आकारणी या करिता -घरपट्टी पावती, आधारकार्ड, सत्यप्रतिज्ञा पत्र १०) परवाना दुय्यम प्रत - अर्ज, घरपट्टी पावती, आधारकार्ड, करारनामा, ११) दिव्यांग नोंदनी - जिल्हा शल्य चिकित्सक किंवा तत्सम प्राधिकृत अधिकारी यांचेकडील अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड (मनपा हद्दीतील), शिधापत्रिका, अर्जदाराचे फ़ोटो, घरपट्टी भरल्याची पावती, इलेक्शन कार्ड इत्यांदी कागदपत्रांसह खालील नमुद केलेल्या ठिकाणी सकाळी १० ते ५.३० वाजेपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासन आपल्या दारी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावे असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी केली आहे.
१)प्रभाग क्र. ५- दगडी शाळेच्या मागे मंडई प्रभू आळी मनपा शाळा क्रमांक ०१ येथे दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी,२)प्रभाग क्र. ३-भाग्यनगर शाळा क्रमांक ७५, भिवंडी येथे,दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी,३)प्रभाग क्र. १ - गायत्री नगर मनपा शाळा क्रमांक ५६ नागाव येथे दि २९ फेब्रुवारी २०२४ रोजी ४)प्रभाग क्र. २- मनपा शाळा क्रमांक ८७, नवी वस्ती, भिवंडी येथे दि. ०१ मार्च २०२४ रोजी शिबीराचे आयोजन होणार आहे.
रिपोर्टर