23 भिवंडी लोकसभा मतदार संघ अतर्गत 134 भिवंडी ग्रामीण (अ.ज) विधानसभा मतदारसंघात तृतीय पंथीयांमध्ये मतदान जनजागृती

भिवंडी। भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक स्वीप कार्यक्रम मतदार जनजागृती अभियान सुरू आहे. तृतीय पंथीय मतदार यांच्यामध्ये मतदान जनजागृती होणे आवश्यक आहे याकरता निवडणूक आयोग प्रचार व प्रसार करीत आहे. मतदान जागृती आणि मतदान करणे या प्रचाराचा एक भाग म्हणून  23 भिवंडी लोकसभा मतदार संघ अतर्गत 134 भिवंडी ग्रामीण (अ.ज) विधानसभा  मतदारसंघातील स्वीप पथक प्रमुख संजय अस्वले यांनी दिलेल्या निर्देशानुसार गायत्री नगर येथील तृतीयपंथीय मतदारांना त्यांच्या रहिवासी भागात जावुन मतदान जनजागृती साठी भेट देऊन तृतीयपंथीय मतदारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना मतदान करण्याचे आव्हान स्वीप पथकाने दिले. 

याप्रसंगी 134 भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कक्षातील कार्यरत योगेशकुमार पाटील,महसूल सहाय्यक तहसील वाडा, काशिनाथ पाटील, सतीश जोशी, किरण पवार, शिवकांत खोडदे, उदय पाटील, अश्विनी पवार 

तसेच किन्नर अस्मिता,युनिट 2 तृतीयपंथीयासाठी HIV Aids जनजागृती व social welfare scheme बाबतीत संस्था काम करते त्या संस्थेचे संचालक निता केणे व प्रोजेक्ट मॅनेजर डाॅ.रुमाना अन्सारी हे देखील उपस्थित होते.अशी माहिती 23, भिवंडी लोकसभा मतदार संघाचे स्वीप विभाग प्रमुख विठ्ठल डाके यांनी दिली.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट