भिवंडी शहरातील अधिकाधिक नागरिकांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२४ (दुसरा) चा लाभ घ्यावा - अजय वैद्य आयुक्त

भिवंडी। भारत निवडणूक आयोगाने दिनांक २० जून २०२४ रोजीच्या पत्रान्वये दिनांक १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२४ (दुसरा) घोषित केला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक २५ जुले २०२४ ते दिनांक ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२४ (दुसरा) अंतर्गत नवमतदारांचे नाव नोंदणी. मतदारांच्या नाव / पत्त्यातील बदल, स्थलांतरित मतदार, मयत मतदारांचे नाव वगळणी करिता दावे व हरकती मागविण्यात येणार आहेत. आगामी काळात लवकरच विधानसभा निवडणूक पार पडणार असल्याने सदर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२४ (दुसरा) महत्वाचा आहे.

त्याअनुषंगाने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी दिनांक २५ जुलै २०२४ ते दिनांक ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, २०२४ (दुसरा) अंतर्गत नवमतदारांचे नाव नोंदणी, मतदारांच्या नाव / पत्त्यातील बदल. स्थलांतरित मतदार, मयत मतदारांचे नाव वगळणी करिता दावे व हरकती मतदार नोंदणी अधिकारी, १३६ भिवंडी (पश्चिम) मतदारसंघ, तहसिलदार कार्यालय, भिवंडी तसेच मतदार नोंदणी अधिकारी. १३७ भिवंडी (पूर्व) मतदारसंघ, उपविभागीय कार्यालय, भिवंडी यांचेकडे दाखल करण्याचे आवाहन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट