
नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तरच रुग्ण संख्येवर नियंत्रण येऊ शकेल - आयुक्त
- एबी न्यूज, वार्ताहार
- Apr 16, 2021
- 681 views
कल्याण ।। महापालिका क्षेत्रात सर्वत्र कोरोना साथीच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निर्बंध लागू केले असून पुढील 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. तरी नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून स्वयंशिस्त पाळली तरच रुग्ण संख्या नियंत्रणात येईल, माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिली.
राज्याच्या टास्कफोर्सने कोविड मँनेजमेटबाबत दिलेल्या सूचना सर्व कोविड हॉस्पिटलला देण्यासाठी महापालिका क्षेत्रातील कोविड हॉस्पिटलबरोबर आज वेबिनार घेण्यात आला. टास्कफोर्सने दिलेल्या सूचनांनुसार रेमिडीसीविर हे इंजेक्शन लाईफ सेविंग इंजेक्शन नाही, 2 ते 9 दिवस या कालावधीत हे इंजेक्शन दिले तरच इफेटीव्ह होते. काही ठिकाणी ते 10 दिवस दिले जाते,त्याबाबत महापालिका आयुक्तांनी वेबिनारमध्ये उपस्थित डॉक्टरांना सूचना दिल्या. ऑक्सिजनच्या वापर डॉक्टरांनी कसा करावा यांच्या सूचना टास्कफोर्सनी दिल्या असून सर्व रुग्णालयानी रुटीन सर्जरी शक्यतोवर पुढे ढकलाव्यात म्हणजेच त्यासाठी लागणारा ऑक्सिजन कोविड रुग्णासाठी वापरता येऊ शकेल अशाही सूचना सदर वेबिनारमध्ये दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांना कोविड सदृश्य लक्षणे असतील तर त्यांनी महापालिकेच्या अँटीजेन टेस्टिंग सेन्टरवर जाऊन मोफत टेस्ट करून घ्यावी. टास्कफोर्सनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड रुग्णांनी दर 4 तासांनी ताप तपासणे, 7 तासांनी saturation तपासणे आदी बाबी कटाक्षाने पाळाव्यात,
नागरिकांनी पुढील 15 दिवस अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पळू नय आणि नियमाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
रिपोर्टर