ब प्रभागक्षेत्रात 2 अतिधोकादायक इमारतींवर निष्कासनाची धडक कारवाई

कल्याण ।। पावसाळयात, अतिवृष्टीच्या कालावधीत दुर्घटना टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारती निष्कासित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी यांना दिले आहे. त्या अनुषंगाने अति. आयुक्त सुनिल पवार व विभागीय उप आयुक्त अर्चना दिवे यांचे मार्गदर्शनाखाली ब प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी आज कल्याण(प) चिकणघर येथील आत्माराम भोईर निवास (तळ + 2) ही अतिधोकादायक इमारत पाडण्यास प्रारंभ केला आहे. सदर इमारत ही अतिधोकादायक असल्यामुळे त्या इमारतीस सन 2018 पासून नोटीस बजावण्यात येत होती, ही इमारत रहिवास मुक्त होती.

त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम चिकणघर येथील सिताराम निवास या तळ मजल्याच्या आर.सी.सी बांधकाम असलेल्या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची धडक देखील आज ब प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी सुरु केली. सदर इमारत रहिवासमुक्त असून त्या इमारतीस यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. सदर कारवाई अतिक्रमण निर्मुलन पथकातील 10 कर्मचारी, महापालिकेचे 8 पोलिस कर्मचारी, महात्मा फुले पोलिस स्टेशनचे 5 पोलिस कर्मचारी व 1 जेसीबी आणि 1 पोकलेन मशीन यांचे सहाय्याने करण्यात येत आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट