२६ नोव्हेंबर रोजी कार्ला एकविरा येथे `एक दिवस कायस्थांचा' सोहळा

कल्याण : चांद्रसेनिय कायस्थ प्रभु तथा सीकेपी समाजातर्पेâ कार्ला येथील एकविरा गडावर साजरा होणारा `एक दिवस कायस्थांचा' सोहळा २६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून यावर्षी होणारा सोहळा भव्य प्रमाणात साजरा होणार असल्याची माहिती उत्सवाचे संयोजक रघुवीर देशमुख  राजेश देशपांडे यांनी दिली.

गेली पाच वर्षे एकविरा गडावर `एक दिवस कायस्थांचाहा उत्सव साजरा केला जातोउत्सवासाठी देशाच्या विविध भागातून शेकडो सीकेपी बांधव येत असतातत्या दिवशी संपूर्ण दिवस विविध धार्मिक कार्यक्रम  करीत देवीला साकडे घालण्यात येतेयावर्षीही सकाळपासूनच अनेक कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहेत्यात प्रामुख्याने एकविरा देवीचा महाअभिषेकपायरी पूजनदेवीचा होमदेवीचा गोंधळभक्तीसंगीताचा कार्यक्रमसीकेपी ज्ञातीत काम करणार्या मान्यवरांचे सत्कारमहाआरती इत्यांदी विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहेविशेष म्हणजे कार्ला एकविरा येथे येण्यासाठी दादरबोरीवलीमुलुंडठाणेडोंबिवलीकल्याणअंबरनाथपुणे इत्यांदी ठिकाणांहून खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

यंदा होणारा सोहळा नेत्रदिपक सोहळा होणार असल्याने जास्तीत जास्त भक्तांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन कायस्थांची श्री एकविरा विश्वस्त संस्थेतर्पेâ करण्यात आले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट