
२३ भिवंडी लोकसभा मतदारसंघातर्गत १३७ भिवंडी (पूर्व) व १३८ कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदार संघातील अधिकारी-कर्मचारी यांचे प्रथम पायाभूत प्रशिक्षण व ईव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण संपन्न
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Apr 06, 2024
- 197 views
भिवंडी।। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्यानुषंगाने २३ भिवडी लोकसभा मतदारसंघांतर्गत, १३७ भिवडी (पूर्व) व १३८ कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदार संघातील अधिकारी-कर्मचान्यांचे प्रथम पायाभूत प्रशिक्षण व ईव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण दि६/०४/२०२४ रोजी संपन्न झाले. हे प्रशिक्षण जिल्हाधिकारी ठाणे तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली २३भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्री. संजय जाधव यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आले.
२३ भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरिता 20 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून यात ६ विधानसभा मतदार संघ येत असून यामध्ये १३७ भिवंडी (पूर्व) व १३८ कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई यांचे करीता शनिवार ६ एप्रिल २०२४ रोजी मतदान प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये १३७ भिवंडी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी म्हणून नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना प्रथम पायाभूत प्रशिक्षण अमित सानप १३७ भिवंडी (पूर्व) मतदारसंघाचे सहा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले. सदर प्रशिक्षणावेळी संजय जाधव मा. निवडणूक निर्णय अधिकारी २३ लोकसभा मतदार संघ, अजय घुळवे व अभय गायकवाड अति. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी १३७ विधानसभा मतदारसंघ, मदन शेलार नायब तहसिलदार उपस्थित होते. यावेळी सर्व केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त निर्देशानुसार व आपणांस प्रशिक्षणात दिलेल्या सुचना नुसार निवडणूकीचे कर्तव्य पार पाडावयाचे असले बाबत संजय जाधव मा. निवडणूक निर्णय अधिकारी २३ लोकसभा मतदार संघ यांनी सुचित केले.
तर १३८ कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर निवडणूक कामी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी म्हणून नेमण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी यांना प्रथम पायाभूत प्रशिक्षण/मार्गदर्शन रोहित कुमार राजपूत १३८ कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदारसंघाचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले.
१३७ भिवंडी (पूर्व) व १३८ कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रथम प्रशिक्षणासाठी EVM मशीन तयार करण्यात आल्या. प्रथम प्रशिक्षणाच्या दिवशी EVM
प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी कक्ष तयार करण्यात आलेले होते. त्या ठिकाणी मतदान कक्षावर नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रिय अधिकारी यांच्यामार्फत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी EVM मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
रिपोर्टर