भिवंडी मनपा कार्यक्षेत्रातील दिशा स्पेशल चाइल्ड स्कूलला आयुक्त अजय वैद्य याची भेट

भिवंडी।। भिवंडी मनपा कार्यक्षेत्रातील दिशा स्पेशल चाइल्ड स्कूलला मा. आयुक्त साो. अजय वैद्य यांनी नुकतीच  भेट दिली. सदर भेटी दरम्यान त्यांनी तेथील शाळेची संपूर्ण पहाणी केली. सदर पहाणीत त्यांनी तेथील शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व समास्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

शासनाकडून दिलेल्या निर्देशाप्रमाणे राष्ट्रीय कार्यक्रम राबविले जातात व विद्यार्थ्यांनी तयार केलेली कला साहित्य यांची माहिती घेतली. विशेष शाळेकरीता ई-बस सेवा ही स्पेशल चाईल्ड हे ज्या ठिकाणाहून शाळेत येतात त्या परिसरातून ई-बससेवा शाळेचे वेळेनुसार सुरु केल्याने जास्तीत जास्त पालक आपले पाल्यांस स्पेशल चाईल्ड शाळेत दाखल करतील. त्यामुळे भिवंडी मनपा कार्यक्षेत्रातील स्पेशल चाईल्ड यांना फायदा होईल. स्पेशल चाईल्ड स्कूलकरीता ई-बस सेवा सुरु करण्याचे आश्वासन मा.आयुक्त साो. यांनी दिले. स्पेशल चाईल्ड यांनी तयार केलेले कला-साहित्य यांचे प्रदर्शन मनपा कार्यालयाचे परिसरात ठेवण्यात  येईल व त्यांचे गरजेनुसार थेरपिस्ट यांची सेवा देण्याचे आश्वासन मा.आयुक्त साो. यांनी दिले. शाळेची निगा कोणत्या प्रकारे करता याबाबत मा.आयुक्त साो यांनी माहिती घेतली. तेथील शिक्षक यांनी मांडलेल्या समस्यांचे समाधान करण्यात येईल याचे आश्वासन मा. आयुक्त साो यांनी दिली.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट