भिवंडीतील अनाधिकृत शाळांवर कारवाई करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन

भिवंडी: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात पालिका शिक्षण विभागाने 21 अनधिकृत शाळा असल्याचा घोषित केले असून या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन केले आहे. परंतु पालिका प्रशासन अशा अनधिकृत शाळांवर कोणतीही कारवाई करीत नसल्याने या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टी भिवंडी शहर अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अब्दुल गनी खान यांच्या नेतृत्वाखाली 10 जुलै रोजी पालिका मुख्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अब्दुल गनी  खान यांनी निवेदनाद्वारे दिले आहे.

शहरात 21 प्राथमिक शाळा या अनधिकृत असल्याचे घोषित केल्यानंतर पालिका प्रशासनाने या शाळांवर कारवाई करणे गरजेचे असताना या शाळा आज ही सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप अब्दुल खान यांनी केला असून या शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करून प्रतिदिन दहा हजार रुपये प्रति दंड आकारणी करणे गरजेचे असताना पालिका शिक्षण विभाग अधिकृत शाळा चालकांसोबत हात मिळवणी करून कोणती कारवाई करीत नाही त्यामुळे अशा शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही शाळां मध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे अशी भीती अब्दुल खान यांनी व्यक्त केली असून शहरात या शाळां व्यतिरिक्त अजून ही काही शाळा अनधिकृतपणे सुरू असून त्यांचा समावेश सुध्दा अनधिकृत शाळांच्या यादीत करावी अशी मागणी अब्दुल गनी खान यांनी पालिका प्रशासना कडे केली आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट