
अफवांवर विश्वास ठेवू नये ;भिवंडी पोलीस उपायुक्तांचे नागरिकांना आवाहन
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Sep 19, 2024
- 342 views
भिवंडी। दोन दिवसांच्या तणावानंतर सध्या शहरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित झाली असून शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, जर एखादी दुर्घटनांना आपल्यासमोर घडत असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन भिवंडीचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त डॉ मोहन दहिकर यांनी गुरुवारी सायंकाळी तातडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत नागरिकांना केले आहे.
भिवंडीत दहा दिवसांचे गणेश विसर्जन व त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या ईद-ए-मिलाद निमित्त निघालेल्या जुलूस दरम्यान घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण झालेल्या तणावामुळे भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची राज्य शासनाने तडकाफडकी बदली केली असून त्यांच्या जागी गुरुवारी डॉ मोहन दहिकर यांनी पदभार सांभाळला आहे. शहरात सध्या शांतता प्रस्थापित झाली असून शहरातील मुख्य चौक,नाके, वस्त्या व शहरात येणाऱ्या महामार्गांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सध्या शहरातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे असून नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असून शहरातील शांतता भंग करणाऱ्या समाज कंटकांवर निष्पक्ष पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती देखील पोलीस उपायुक्त दहीकर यांनी दिली आहे.
रिपोर्टर