
मा.सभापती कुंदन पाटील यांच्या प्रयत्नांनी लाभार्थांना स्कूटी गाडी व स्वयंरोजगारासाठी २५ हजार
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Jul 16, 2021
- 596 views
भिवंडी।। ठाणे जिल्हा परिषद मा. बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती श्री.कुंदन तुळशिराम पाटील यांच्या सततच्या प्रयत्नांनी पिंपळास गावातील ५५ टक्के पेक्षा जास्त अपंग असणारे अल्पेश गायकवाड यांना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या निधीतून १ लाख १६ हजार ५०० रुपये किमतीची स्कुटी गाडी मंजुर व दापोडे गावातील महिला सोनाली सज्जन पाटील हिला रोजगारासाठी २५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटील,पिंपळास सरपंच सोनाली चौधरी,शिव अंगणवाडी सेना तालुका महिला संघटक सरिता पाटील, दापोडे गावातील महिला शिवसेना पदाधिकारी उषा चौधरी,ललिता पाटील,कांचन पाटील,प्रतिभा पाटील,पिंपळास ग्रामसेवक शिरसाठ अन्य इतर उपस्थित होते.
रिपोर्टर