
भिवंडीत पुढील सूचना मिळे पर्यंत पाच पैकी तीन केंद्रांवरील लसीकरण बंद
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Jul 16, 2021
- 612 views
भिवंडी ।। भिवंडी पालिका क्षेत्रातील नागरीकांसाठी सुरू असलेला कोविड १९ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्या कारणाने दि.१७ जुलै पासून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कार्यान्वीत असलेले पाच लसीकरण केंद्रांपैकी १) खुदाबक्श हॉल, टावरे स्टेडियम, गौरीपाड़ा २) मनपा शाळा क्र. ७५, भाग्यनगर नागरी आरोग्य केंद्र, भाग्यनगर कामतघर हे दोन लसीकरण केंद्र मर्यादीत क्षमतेने सुरु राहतील. तसेच उर्वरीत तीन लसीकरण केंद्र १) मिल्लत नगर नागरी आरोग्य केंद्र, २) मनपा शाळा क्र. ८५, नवीवरती नागरी आरोग्य केंद्र, व ३) ईदगाह रोड नागरी आरोग्य केंद्र, मिनाताई ठाकरे रंगायतन, भिवंडी हे तीन लसीकरण केंद्र पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील अशी माहिती भिवंडी महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ के आर खरात यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे जाहीर केले आहे.
रिपोर्टर