
भिवंडीत पालिकेतर्फे कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहीम सुरू
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- Jul 16, 2021
- 416 views
भिवंडी।। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्त देशभरातून कुष्ठरोग व क्षयरोग यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांची शोध मोहीम व नियंत्रण मोहीम राबविण्यात येत असून भिवंडी पालिका क्षेत्रात जुलै ते ऑक्टोबर 2021 दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या क्षयरोग अधिकारी डॉ बुशरा सय्यद यांनी दिली आहे .राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षयरोगा ची लागण झालेल्या नव्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना निशुल्क औषध उपचार उपलब्ध करून देण्यात येत असून त्या माध्यमातून कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांची शृंखला खंडित करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असून त्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून रोगाची लक्षणे ,तपासणी ,उपचार शासकीय रुग्णालयात उपलब्ध असून रुग्णांना पोषक आहार योजने अंतर्गत दरमहा 500 रुपये अनुदान दिले जात असून शहरात तब्बल 114 पर्यवेक्षक 156265 कुटुंबांचे सर्वेक्षण करणार असून त्या कामी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ बुशरा सय्यद यांनी दिली आहे.
रिपोर्टर