शिवसेना उपविभाग प्रमुखपदी नितीन नांदूरकर यांची निवड

भिवंडी :भिवंडी तालुक्यातील टेंभवली येथील  समाज हॉल मध्ये घेण्यात आलेल्या शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थळे,शिवसेना उप जिल्हा प्रमुख तथा भिवंडी मनपाचे नगरसेवक देवानंद थळे ,महिला जिल्हा अध्यक्षा कलाताई  शिंदे ,युवासेना जिल्हा अध्यक्ष प्रभूदास नाईक ,भारतीय विद्यार्थी सेना  तालुका संघटक प्रवीण पाटील, तालुका सचिव राजेंद्र काबाडी, दीपक पाटील, जय भगत, युवासेना भिवंडी तालुका युवा अधिकारी आतिष भामरे, जू:नांदूरखी च्या माजी उपसरपंच सुनीता पाटील, उप तालुका प्रमुख श्रीधर खारीक, भिवंडी पंचायत समितीचे  माजी सदस्य बबन पाटील ,विभाग प्रमुख चंद्रकांत पाटील ,युवासेनेचे नितीन पाटील,जी प सदस्य  प्रकाश तेलीवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

१२ जुलै ते २७ जुलै  शिव संपर्क अभियान अंतर्गत सुरू असणाऱ्या  तालुक्यातील मौजे टेंभवली येथील खारबाव गणातील  शिवसैनिक नितीन नांदुरकर यांची  यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली.शिवसंपर्क अभियान अंतर्गत तालुकाप्रमुख  विश्वास थळे व उपतालुका प्रमुख  रमेश तरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे.

नितीन नांदुरकर यांची उपविभाग प्रमुखपदी (खारवाब गट) निवड झाल्याने  त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .नितीन नांदूरकर यांची निवड झाल्याने आपल्या विभागात व आपल्या गावात शिवसेना वाढीसाठी  ते नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा नरेंद्र गोराडकर यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील यांनी केले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट