आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे रुग्णवाहिका होणार सुपुर्द

भिवंडी।। आषाढी एकादशी निमित्त श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण पंढरपूर येथे २०/०७/२०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते होणार आहे.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतुन  डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला एक अद्यावत रुग्णवाहिका भेट देण्यात येणार आहे. आज ठाणे येथून ही रुग्णवाहिका पंढरपूरकडे रवाना झाली. राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव  ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य  ठाकरे  यांच्या शुभ हस्ते आषाढी एकादशीच्या दिवशी या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.अशी माहिती आमच्या प्रतिनिधी शी बोलतांना विक्रमगड चे समन्वयक पालघर जिल्हा ग्रामीण शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रवींद्र भोईर यांनी दिली.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट