ग्रु ग्रा.पं.पिसे येथे स्व.निर्मला गोपिनाथ पाटील सभागृहाचे उद्घाट‌न

भिवंडी।।भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पिसे येथे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन स्व.निर्मला गोपीनाथ पाटील सभागृहाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.स्व.निर्मला गोपिनाथ पाटील सभागृहाच्या माध्यमातुन गावातील महिलांसाठी स्वयंरोजगार,महिला बैठका,महिला सक्षमीकरण व सबळीकरण करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विजय पाटील यांनी दिली आहे.कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणुन शिवसेनेचे विजय पाटील यांनी गरजुंना मदत कार्य करुन गावाच्या प्रत्येक विकास कामात भरीव योगदान दिल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील,युवासेना जिल्हा प्रमुख यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी सरपंच रिंकल विजय पाटील,शिवसेनेचे श्याम पारधी,यशवंत केणे,उपतालुका प्रमुख हनुमान पाटील,मा.सरपंच संदीप म्हात्रे,भगवान केणे,हेमंत गुळवी,उपसरपंच सपना महेंद्र पाटील,सदस्य जंता भास्कर म्हात्रे,वैशाली सुजय पाटील,राम तुकाराम वाघे,अशोक जाधव,मा.सरपंच‌ रमेश पाटील इत्यादी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट