संगम मुरबाड येथे कोकण पत्रकार संघाचा 9 वा वर्धापनदिन आणि कोकण विभागातील रत्नांचा पुरस्काराने गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

भिवंडी:कोनगावचे सुपुत्र, आगरी समाज भूषण प्रा.विनोद हनुमान पाटील कोनकर यांना कोकण क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच बाबाजी पाटील यांना कोकण समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले, मयूर शेळके यांना कोकण शौर्य पुरस्काराने सन्मानित केले.कोकणातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या  एकूण 35 मान्यवरांचा सन्मान करण्यातआला या कार्यक्रमाचे अध्यक्ष  संजय यादवराव  तसेच प्रमुख पाहुणे शहापूरचे आमदार दौलत दरोडा,श्री. नानजीभाई ठक्कर,ठाणे जिल्हा बँकेचे मा.अध्यक्ष तथा नगरसेवक  बाबाजी पाटील,कोकण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील,अध्यक्ष जयेश शेलार पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामराव पतंगराव,बबन हरणे, अन्य मान्यवर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोनगावचे सुपुत्र, आगरी समाज भूषण,समाजरत्न, अष्टपैलू गुण संपन्न प्रा.विनोद हनुमान पाटील कोनकर यांना कोकण रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गावच्या सरपंच डॉ.रुपाली अमोल कराळे,उपसरपंच दर्शन म्हात्रे, सर्व सदस्य,ग्रामस्थ,मित्र परिवार, आप्तेष्ट नातेवाईक, सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट