ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण कडून दरवाढी विरोधात जनजागरण अभियानास सुरुवात

भिवंडी। सातत्याने दरवाढ करून स्वतः च्या तिजोऱ्या भरणाऱ्या मोदी सरकारचा विरोध करण्यासाठी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीकडून जनजागरण अभियान जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात भिवंडीत ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा प्रभारी सुभाष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.यावेळी माजी खासदार सुरेश टावरे, राज्य सचिव राजेश घोलप,ठाणे जिल्हा सहप्रभारी निलेश पेंढारी,महिला अध्यक्षा संघजा मेश्राम आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा प्रभारी सुभाष कानडे यांनी सांगितले की देशामध्ये दिवसेंदिवस इंधन आणि डाळींच्या किमतीमध्ये बेसुमार वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांना जगावे कसे हा प्रश्न पडला आहे.मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात येणार असे आश्वासन दिले होते परंतु लहानमोठे उद्योगधंदे बंद झाले असून उद्योजक हवालदिल झाले आहेत.कित्येक कंपन्या बंद झाल्याने युवक बेरोजगार झाले आहेत.अजूनही अडीच लाख कोटी जुन्या नोटा बाहेर असून रिझर्व्ह बँकेकडून त्या बदलून दिल्या जात आहेत आणि तो पैसा आरएसएवाल्यांकडे जात आहे असा आरोप करून सदर जनजागरण अभियानात भाजपची पोलखोल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गॅस सिलेंडर सह घरगुती वापराच्या सर्वच किमतीमध्ये बेसुमार वाढ झाली असून आपलं पुन्हा कृत्रिम गुलामगिरीत आलो असल्याचे वाटत आहे आणि काँग्रेसची सत्ता ही जनतेची सत्ता होती तर आताचे सरकार हे उद्योगपतींची दलाली करीत आहे असा घणाघाती आरोप ठाणे जिल्हा सहप्रभारी निलेश पेंढारी यांनी यावेळी केला.
सदर जनजागरण अभियान जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावागावात दिनांक १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ७ ते संध्याकाळी १० वाजेपर्यंत  चालविले जाणार असून यावेळी प्रभातफेरी,पदयात्रा,पत्रके आदीद्वारे लोकांमध्ये मोदी सरकारविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे.यावेळी शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके, अंबरनाथ तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील,मुरबाड तालुका अध्यक्ष चेतन पवार,कल्याण ग्रामीणचे सोमनाथ मुरकुटे,मुरबाड विधानसभा महिला अध्यक्षा नीरजा आंबेरकर, संध्या कदम,ओबीसी जिल्हा अद्यक्ष दिनेश सासे, पर्यावरण अध्यक्ष रामचंद्र जोशी आणि जिल्ह्यातील सर्व ब्लॉक कमिटी अध्यक्ष उपस्थित होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट