23 भिवंडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक स्वीप कार्यक्रम मतदार जनजागृती अभियान

भिवंडी।। जिल्हाधिकारी व  निवडणूक अधिकारी यांचा मार्गद्शनाखाली नितीन पाटील (सहाय्यक आयुक्त, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका), रंजना कंकाळ (बाल विकास प्रकल्प अधिकारी भिवंडी पश्चिम), युवराज वडेकर (संरक्षण अधिकारी भिवंडी निजामपूर), सीमा भावसार (मुख्य सेविका बाल विकास प्रकल्प कार्यालय भिवंडी पूर्व) व प्रतिभा वीर (मुख्य सेविका बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय भिवंडी पश्चिम) यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कार्यकर्ती यांना माता सभा, किशोरवयीन मुली यांच्या बैठका, ज्येष्ठ नागरीक मंच या माध्यमातून कश्या पद्धतीने लोकांमध्ये मतदानाच्या कर्तव्या संदर्भात जाणीव जागृती करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मतदान संदर्भात संकल्प घेण्यात आला. सदर कार्यक्रमात अंगणवाडी कार्यकर्तीना भित्ती पत्रकाचे वाटप करण्यात आले.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट