23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वसाधारण, खर्च व पोलीस निरीक्षक दाखल

भिवंडी।। भारत निवडणूक आयोगाने 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे तीनही निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले असून त्यांनी कामकाजाला सुरूवात केली आहे.

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून राजनवीर सिंग कपूर (आयएएस), खर्च निरीक्षक म्हणून चित्तरंजन धंगडा माझी (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक म्हणून के.जयरामन (आयपीएस) यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली असून हे तीनही निरीक्षक भिवंडी लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत।

खर्च निरीक्षकांना भेटण्याची वेळ ::: :::::::::::::

23-भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निरीक्षक.कपूर (आयएएस) यांचा संपर्क क्रमांक 8356074530 असा असून genobserver23bhiwandi@gmail.com हा त्यांचा ईमेल आहे.कपूर यांना ठिकाण एम.एस.टी.सी.एल. रेस्ट हाऊस, तळ मजला, पडघा, ता.भिवंडी येथे दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत भेटता येईल.

पोलीस निरीक्षक जयरामन (आयपीएस) यांचा संपर्क क्रमांक 8788484783  असा असून ईमेल पत्ता  kjraman97@yahoo.co.in असा आहे. जयरामन यांना ठिकाण एम.एस.टी.सी.एल. रेस्ट हाऊस, पहिला मजला, पडघा, ता.भिवंडी येथे दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत भेटता येईल.

निवडणूक खर्च निरीक्षक माझी (आयआरएस) यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, उपविभागीय कार्यालय, भिवंडी येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. क्रमांक केंद्रीय खर्च निरीक्षक माझी (आयआरएस) यांचा मतदारसंघातील संपर्क क्रमांक ८३६९७३६०८२ असा असून bhiwandiexpobs@gmail.com हा त्यांचा ई-मेल आहे।

रिपोर्टर

संबंधित पोस्ट