
23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मतदान चिठ्ठ्या वाटप
- महेंद्र कुमार (गुडडू), ब्यूरो चीफ भिवंडी
- May 16, 2024
- 191 views
ज्या मतदारांना चिठ्या मिळालेल्या नाहीत त्यांनी नजीकच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा... निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव
भिवंडी। सहा विधानसभा अंतर्गत सर्व मतदारांना मतदार चिठ्या वाटण्याचे काम चालू आहे. 134 भिवंडी ग्रामीणमध्ये एकूण मतदान केंद्र 345 असून आत्तापर्यंत तीन लाख 23 हजार 978 मतदान मतदार स्लिप प्राप्त झाल्या असून त्यापैकी दोन लाख 73 हजार 561 म्हणजेच अंदाजे , 135 शहापूर मध्ये 326 मतदान केंद्र असून एकूण मतदार स्लिप 279137 प्राप्त झाल्या असून त्यापैकी 254907 वाटप झाल्या आहेत. 136 भिवंडी पश्चिम मध्ये 297 मतदान केंद्र असून 304959 मतदार स्लिप प्राप्त झाल्या असून 271537 मतदार स्लिप वाटप झाल्या आहेत.137 भिवंडी पूर्व मध्ये 314 मतदान केंद्र असून 336110 मतदार स्लिप प्राप्त झाल्या आहेत त्यापैकी 305860 मतदार चिठ्ठ्या वाटप करण्यात आल्या आहेत.
138 कल्याण पश्चिम मध्ये 398 मतदान केंद्र असून 400138 मतदार स्लिप प्राप्त झाल्या आहेत त्यापैकी 325593 मतदार स्लिप वाटप करण्यात आले . 139 मुरबाड मतदार संघात 511 मतदान केंद्र असून 442922 मतदार स्लिप प्राप्त झाल्या असून त्यापैकी 346365 मतदार चिठ्या वाटप करण्यात आले आहे. जवळपास 85% चिट्ठ्या वाटप झाल्या पूर्ण झालेल्या असं उर्वरित लोक काम देखील दोन-तीन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या मतदारांना आपल्या मतदार चिठ्ठ्या प्राप्त झालेल्या नाहीत त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी एल ओ) यांच्याशी संपर्क साधावा , तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ उपस्थित राहणार आहेत त्यांच्याकडून आपल्या मतदान मतदान चित्र प्राप्त करून घ्याव्यात असे आवाहन 23 भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे
रिपोर्टर