श्री गणेशोत्सवासाठी कल्याण डोम्बिवली महापालिकेची जय्यत तयारी

कल्याण ।। या वर्षीच्या श्री गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केली असून महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत सर्व प्रभागात श्री गणेशोत्सवाच्या काळात रात्रीचे वेळी नागरीकांची गैरसोय होवू नये म्हणून २६७० हॅलोजन बसविण्यात आले असून, एकूण ७२ जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ९४ ठिकाणी टॉवर लाईटींग व्यवस्था करण्यात आली असून, ३४ ठिकाणी एकूण १७२ सी.सी.टी. कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील या वर्षीच्या श्री गणेश उत्सवाकरिता विविध परवानगी देण्याकरिता महापालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्रामध्ये दि. ०८/०९/२०२३ पासून "एक खिडकी योजना" कार्यान्वित करण्यात आली होती. एक खिडकी योजने अंतर्गत स्टेजसाठी एकूण ३१७ परवानगी आणि कमानींसाठी एकूण १३ परवानगी अग्निशमन विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिका क्षेत्रातील एकूण २७ श्री गणेशाचे विसर्जन स्थळी बंदोबस्ताकरिता महापालिकेचे अग्निशमन विभाग व अग्निशमन विभागाने नियुक्त केलेल्या ठेकेदारांमार्फत कुशल कर्मचारी विमोचन व बचाव कार्यासाठी लागणा-या आवश्यक साहित्यांसह नियुक्त करण्यात आले आहेत.‍

कल्याण परिसरात श्री गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी २३ नैसर्गिक तलाव, २४ कृत्रिम तलाव आणि पर्यावरण पूरक श्री गणेश मुर्तीसाठी ३३ ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. तसेच अ, ब, क, ड व जे प्रभागात विसर्जन आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

डोंबिवली परिसरात श्री गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी २४ नैसर्गिक तलाव, २० कृत्रिम तलाव आणि फ, ग व ह प्रभागात ३ विसर्जन आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली (पूर्व) खंबाळपाडा येथे पर्यावरण पूरक श्री गणेश मुर्ती विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्व विसर्जन स्थळांवर भाविकांच्या सोयीसुविधांसाठी १/अ प्रभागात सहा.आयुक्त प्रिती गाडे, २/ब प्रभागात सहा.आयुक्त राजेश सावंत, ३/क प्रभागात सहा.आयुक्त तुषार सोनवणे, ४/जे प्रभागात सहा.आयुक्त सविता हिले, ५/ड प्रभागात सहा.आयुक्त धनंजय थोरात, ६/फ प्रभागात सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप, ७/ह प्रभागात सहा.आयुक्त स्नेहा करपे, ८/ग प्रभागात सहा.आयुक्त सोनल देशमुख, ९/आय प्रभागात सहा.आयुक्त हेमा मुंबरकर व १०/ई प्रभागात सहा.आयुक्त भारत पवार या समन्वय अधिका-यांची नेमणूक करण्यात आली असून, या सहाय्यक आयुक्तांनी परिमंडळ-१ चे उपआयुक्त धैर्यशील जाधव आणि परिमंडळ-२ चे उपआयुक्त अवधुत तावडे यांच्या नियंत्रणाखाली काम करणेबाबत आदेश महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी निर्गमित केला आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट